एरंडोल: नर्व्हाळ जिल्हा धुळे येथील कुटुंबिय एरंडोल तालुक्यातील विखरण येथे विवाहास जात असताना पलासदळ फाट्यानजिक त्यांच्या दुचाकीस राज्य परिवहन महामंडळ तिकीट तपासणी विभागाच्या वाहनाने जबर धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील २ जण गंभीर तर २ जणांना किरकोळ दुखापत झाली.
चौघ्या जखमींना आरोग्यदूत विक्की खोकरे यांनी आपल्या रूग्णवाहिकेव्दारे जळगाव येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले असता ते उपचार घेत आहेत. ही घटना बुधवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली.जखमींची नावे पुढीलप्रमाणे: निवृत्ती रविंद्र भालेराव-वय ३८, ज्योती निवृत्ती भालेराव-वय ३२, देवेंद्र निवृत्ती भालेराव- वय १० व कार्तिकी निवृत्ती भालेराव – वय ८ वर्षेभालेराव कुटुंबीय हे विखरण येथे वऱ्हाडी म्हणून लग्नकार्यास जात असताना अवघ्या ६किलोमिटर अंतरावर त्यांचेवर अपघाताचे विघ्न कोसळले.राज्य परिवहन महामंडळ तिकीट तपासणी विभागाच्या वाहनात एकूण ४अधिकारी होते. या वाहनाने पुढे चालत असलेल्या दुचाकीला धडक दिली या बाबत एरंडोल पोलिस स्टेशन ला रात्री उशिरा पर्यंत काही एक नोंद नव्हती.
Leave a Reply