मुंबई – लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शहरी प्रशासकीय सेवेतील मुख्याधिकारी संवर्गातील बदल्या व पदस्थापना शासनाच्या उप सचिव प्रियंका कुलकर्णी (छापवाले) यांनी काल रात्री केल्या आहेत.
यात एरंडोल शहरातील मुख्याधिकारी तथा प्रशासक विकास रमेश नवाळे यांचाही समावेश आहे.विकास नवाळे यांची बदली अहमदनगर जिल्ह्यातील शेवगांव नगरपरिषद येथे करण्यात आली आहे तर त्यांचा जागी एरंडोल येथे अजून नुतन मुख्याधिकारी बाबत शासनातर्फे कोणतेही आदेश प्रात झालेले नाही. विकास नवाळे यांनी आपल्या कार्यकाळात शहरामध्ये विविध प्रकारचे उपक्रम राबवत स्वच्छताविषयक जनजागृती करत शहरात विकास कामांना भर देत शहर सुंदर व स्वछ केले आहे
राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियानांतर्गत शासकीय अधिकारी गटातून राज्यात प्रथम क्रमांक पटकावले आणि महाराष्ट्र शासनाने त्यांना पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला आहे.मुख्याधिकारी श्री. नवाळे यांनी बचतगटाच्या माध्यमातून फळझाडांची लागवड, त्यातून रोजगार निर्मिती तसेच घनकचरा व्यवस्थापनातून कंपोस्ट खत निर्मिती, पर्यावरणपूरक गणेश मूर्ती, ‘माझी वसुंधरा’ या अभियानाच्या माध्यमातून राबविलेले नाविन्यपूर्ण उपक्रम, कचरा लाखमोलाचा आणि शहरातील जेष्ठ नागरिक व महिलांसाठी राबविलेल्या विविध उपक्रमांचे नियोजन करून अमलबजावणी केली आहे.
मुख्याधिकारी विकास नवाळे यांच्या संकल्पनेतून शहरातील आनंद नगर येथील खुल्या भूखंडावर राज्यातील पहिलाच उपक्रम म्हणजे पुस्तकांचा बगीचा उभारला आहे.
Leave a Reply