एरंडोल: येथे जहागीरपूरा,केवडीपुरा,कागदीपूरा, पाताळनगरी चूना भट्टी ,फकीरवाडा, मुजावर वाडा, तबेला, कुंभारटेक, मारवाडी गल्ली ,गाढवे गल्ली सैय्यद वाडा, कासोदा दरवाजा ,अमळनेर दरवाजा,भामाड ,दखनी वाडा, मुल्ला वाडा ,गांधीपुरा,वैताग वाडी ,लांडापुरा ,रंगारी खिडकी, गढीखालचा परीसर, बालाजी मढी ,नागोबा मढी,मारुती मढी, देशमुख मढी इत्यादी अश्या प्रकारची प्रमुख भागांची प्रचलित नावे आहेत.
बदलत्या परिस्थितीनुसार नव्या पिढीला प्रेरणादायी ठरणारी अशी नविन नावे स्थानिक लोकांचे समर्थन घेऊन या भागांना देण्यात यावी असे जाणकारांचे म्हणणे आहे.
एरंडोल हे ऐतिहासिक व पौराणिक शहर असून या शहराला मोठी ऐतिहासिक परंपरा लाभली आहे. या शहराची पूर्वी एकचक्रनगरी,अरुणावती अशी नावे होती. येथे पौराणिक व ऐतिहासिक अश्या काही वास्तू व स्थळे अजूनही इतिहासाचे साक्षीदार आहेत. हा सांस्कृतिक व ऐतिहासिक परंपरेचा अमूल्य ठेवा राखून बदलत्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी गावातील काही भागांच्या नावांचे नामकरण करण्यात यावे अशी सूचना पुढे येत आहे.
नविन नावे देतांना राष्ट्रासाठी प्राणाची आहुती/बलिदान देणाऱ्या,राष्ट्रउभारणीत मोलाचे योगदान देणाऱ्या महापुरुषांची नावे तसेच राष्ट्रप्रेम व देशाभिमान वृद्धिंगत करणाऱ्यांची नावे देण्यात यावी अशी अपेक्षा आहे.
राज्यभरात काही शहरांची नावे बदलून नविन नामकरण करण्यात आले त्या धर्तीवर एरंडोल येथे शहराचे नाव न बदलता शहरातील काही भागांचे वरीलप्रमाणे नामकरण करण्यात यावे अशी सूचना केली जात आहे.
Leave a Reply