Breaking

पारोळानाजीक चार वाहनांच्या विचित्र अपघातात दोन बसेस मधील वीस प्रवासी जखमी : पहा व्हिडिओ


पारोळा (प्रतिनिधी) येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा वरील विचखेडा गावाजवळ महामार्गाचे काम सुरू असून डायव्हर्शन मोडवर डंपरने पुढे अचानक ब्रेक मारल्याने त्यावर बस धडकली बसच्या मागे मॅटडोअर तिच्या मागे बस असे चार गाड्यांचा विचित्र अपघातात 20 जण जखमी झाल्याचे घटना दिनांक पाच रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास घडली याबाबत घटनास्थळी मोठी गर्दी जमा होऊन जखमींना पारोळा कुटीर रुग्णालय येथे दाखल करण्यात आले.

आज दिनांक पाच रोजी दुपारी वीचखेडे गावानजीक जळगाव नवसारी बस क्रमांक एम एच 40 एन 98 30 ही पुढे चालणाऱ्या डंपरने ड्रायव्हर सणवर अचानक ब्रेक मारल्याने मागवून धडकली त्यानंतर मागवून येणारी 407 मॅटडोअर क्रमांक एम एच 15 एफ वी.59 83 ही बसवर धडकली मॅटडोअर च्या मागून येणारी ठाणे भिवंडी बस एम एच 20 बी एल 15 40 ही मॅटोडोअरवर धडकली असे चार वाहनांचा विचित्र अपघात झाला.

या अपघातात खुशी राहुल पाटील रिंगणगाव, मैनाबाई दिनकर निकम बोळे, रेखाबाई दादाभाऊ महाले मेहू टेहू, दुर्गेश्वरी दादाभाऊ महाले मेहूटेहू, रावसाहेब ओंकार साळुंखे वासखेळी तालुका साक्री, रमेश अभिमान पवार राहणार धुळे, उद्धव एकनाथ सोनवणे मुल्लेर सटाणा,राकेश पुरुषोत्तम रणधीर धुळे मोहाडी, अर्चना राकेश रणधीर धुळे मोहाडी, दिनकर पिरण निकम बोळे,आसिफ अहमद शेख जळगाव, भावना बाळासाहेब सूर्यवंशी टोळी तालुका एरंडोल, बेबाबाई पुंजू मराठे, पुंजू राजाराम मराठे , ललिताबाई संदीप मराठे तिघे राहणार पारोळा रेखाबाई रावसाहेब साळुंखे वासखेळी तालुका साक्री यासह इतर पाच ते सात जण जखमी झाल्याची घटना घडली. सदर जखमींना घटनास्थळावरून जगद्गुरु नरेंद्रचार्य महाराज यांच्या रुग्नेवाकीतून चालक आशुतोष शेलार ऋषिकेश सूर्यवंशी यांनी पारोळा कुटीर रुग्णालय येथे दाखल केले. त्यांचेवर डॉक्टर जिनेन्द्र पाटील, डॉक्टर नईम बेग, परिचारिका निशा, पूजा कापसे आदींनी प्रथमोपचार केलेत.


Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*