Breaking

एरंडोल येथे ओमनी गाडीची चोरी ; चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल


एरंडोल: येथे पंचायत समितीच्या गोडाऊन जवळ लावलेली पांढऱ्या रंगाची मारुती ओमनी गाडी चोरीस गेल्याची घटना ४ फेब्रुवारी २०२४ रोजी उघडकीस आली. एरंडोल येथील किशोर दत्तात्रय पाटील यांनी अमळनेर येथील नरेंद्र शिरसाठ नामक मित्राची एम.एच.१५ बी.एन ३३०० क्रमांकाची मारुती ओमनी गाडी घरगुती वापरासाठी आणलेली होती.

किशोर पाटील हे ३ फेब्रुवारी २०२४ रोजी पद्मालय येथे सहकुटुंब देवदर्शनासाठी गेले व त्यांनी परत येऊन सदर गाडी पंचायत समितीच्या गोडाऊन जवळ लावलेली होती.
४ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळीं ते गाडी लावलेल्या जागी आले असता त्यांना गाडी जागेवर दिसली नाही व आजुबाजूस शोध घेतला असता मिळून आली नाही.

म्हणून किशोर पाटील यांनी ६ फेब्रुवारी २०२४ रोजी पोलिस स्टेशन गाठत तक्रार दिली. याप्रकरणी गुन्हा रजिस्टर नंबर गुरन २७/२०२४ कलम -३७९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल राजेश पाटील व विलास पाटील हे करीत आहेत.


Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*