चाळीसगाव – जळगाव जिल्ह्यात देखील गुन्हेगारी वाढतच चालली आहे नुकतेच नुतन रजू झालेले पोलिस अधीक्षक यांनी पदभार स्वीकारला असता गुन्हेगारी पुन्हा वरती डोकं काढू लागली आहे सर्वसामान्य नागरिकांना सुरक्षिततेच्या बाबत प्रश्न निर्माण झाला आहे.चाळीसगाव शहरात एका माजी नगरसेवकावर संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास अंदाधुंद गोळीबार झाल्याची घटना घडल्याने परीसरात एकच खळबळ उडाली आहे.
महेंद्र मोरे असे गोळीबारात जखमी झालेल्या नगरसेवकांचे नाव आहे ते हनुमानवाडीतील आपल्या कार्यालयात बसलेले असतांना सायंकाळी पावणेपाच वाजता तीन अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला. सुमारे तीन ते चार राऊंड फायर करण्यात आले.यात ते जबर जखमी झाले. त्यांना तात्काळ खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
गोळीबार करणारे मारेकरी चारचाकी वाहनाने फरार झाले आहे पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी नाकाबंदी करण्यात आली आहे.
Leave a Reply