Breaking

धक्कादायक : चाळीसगाव गोळीबारात जखमी झालेल्या माजी नगरसेवकांचा उपचारादरम्यान मृत्यू


चाळीसगाव – येथील नगरपरिषदचे माजी नगरसेवक महेंद्र भगवान मोरे (६०) यांच्यावर पूर्ववैमनस्यातून गोळीबार केल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली होती. मोरे यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी नाशिक येथे हलवण्यात आले होते, मात्र त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे.

गुन्हेगारीवर प्रतिबंधक कारवाई करणे गरजेचे आहे अशा घटनेने नागरिक भयभीत झाली असून पोलिसांचा धाक संपला की काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे

या गोळीबार प्रकरणी अजय संजय बैसाणे (वय २१, रा. चाळीसगाव) यांच्या फिर्यादीवरुन उद्देश उर्फ गुड्डू शिंदे (रा. हिरापूर), सचिन गायकवाड (रा. चाळीसगाव), अनिस शेख उर्फ नव्वा शरीफ शेख (रा. हुडको काॕलनी, चाळीसगाव), सॕम चव्हाण (रा. हिरापूर), भूपेश सोनवणे (रा. चाळीसगाव), सुमित भोसले (रा. चाळीसगाव), संतोष निकुंभ उर्फ संता पहेलवान (रा. हिरापूर) यांच्याविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हल्लाखोरांनी वापरलेली गाडी पोलिसांनी जप्त केली असून आरोपींना देखील लवकरच अटक करण्यात येईल अशी माहिती पोलिसाकडून मिळाली आहे


Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*