जळगाव – 15 फेब्रुवारी रोजी आदित्य ठाकरे यांचा जळगाव दौरा निश्चित झाला असून या दरम्यान त्यांचा 4 सभा पार पडणार असल्याची माहिती शिवसेनेचे जिल्हाप्रमुख डॉ हर्षल माने यांनी दिली. लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागल्याने प्रत्येक पक्षाची तयारी सुरू झालेली आहे. याच पार्श्वभूमीवर जळगाव लोकसभेची जागा ठाकरेंच्या शिवसेनेला मिळणार असल्याची अशी चर्चा आहे.
शिवसेनेचे बंडखोर आमदार जे शिंदे गटात गेले होते त्याचाच मतदारसंघात आदित्य ठाकरे सभा घेणार आहेत. सुरवातीला गुरुवारी सकाळी 11-30 वाजेला जळगावला पहीली सभा घेणार आहोत नंतर शिरसोली 2 वाजेला आणि एरंडोल तालुक्यातील कासोदा येथे 4 वाजेला तर शेवटची सभा भडगाव येथे 6 वाजेला होणार आहे.
नेमका यावेळी विरोधकांवर टीका करतील की कसा समाचार घेतील हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे, त्यानंतर आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
Leave a Reply