Breaking

पत्रकार हा समाजाचा ‘तिसरा डोळा असतो – शिवराम पाटील महाराष्ट्र जागर वेब पोर्टल च्या शुभारंभ प्रसंगी प्रतिपादन..!


प्रतिनिधी एरंडोल: येथे महाराष्ट्र जागर वेब वृत्त पोर्टल चा शुभारंभ १४जानेवारी २०२४ रोजी जिल्हा जागृत मंचाचे अध्यक्ष शिवराम पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. दिपप्रज्वलन माहिती अधिकार कार्यकर्ते दिपककुमार पी.गुप्ता यांनी केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रमोद अण्णा पाटील हे होते.

या प्रसंगी अ.भा.नाट्य परिषदेचे रंगकर्मी संदीप घोरपडे, जिल्हा पत्रकार संघाचे ग्रामीण अध्यक्ष भिका चौधरी, उल्हास पाटील फाऊंडेशन चे राकेश पाटील,सामाजिक कार्यकर्ते भास्कर चौधरी,सुरेश सुर्यवंशी, समाधान चौधरी,ज्येष्ठ पत्रकार तथा तालुका पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष बी.एस.चौधरी,ज्येष्ठ पत्रकार शिवाजीराव अहिरराव,ऍडव्होकेट मोहन बी.शुक्ला, सेवानिवृत्त प्राध्यापक तथा पत्रकार आर.एस.निकुंभ, सेवानिवृत्त मुख्याध्यापक हरिश्चंद्र चौधरी,सेवानिवृत्त शिक्षक डी.एस पाटील,रघुनाथ कोठावदे,सामाजिक कार्यकर्ते नवल किशोर तिवारी,डॉ.मकरंद पिंगळे यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होती.

शिवराम पाटील यांनी आपल्या तडाखेबाज शैलीत सांगितले की, राजकारण्यांवर मतदारांचे नियंत्रण असले तरच लोकशाही जिवंत राहू शकते,मतदारांचा वचक निर्माण करण्याची जबाबदारी मतदारांसोबत पत्रकारांची सुद्धा आहे. कारण पत्रकार हा समाजाचा ‘तिसरा डोळा, असतो.

प्रास्ताविक महाराष्ट्र जागर वेब वृत्त पोर्टल चे संपादक शैलेश चौधरी यांनी केले. आरोग्यदूत तथा लोकराज्य न्यूज २४ चे संपादक विक्की खोकरे यांनी खुमासदार शैलीत सुत्रसंचलन केले तर आभार प्रदर्शन खान्देश वार्ता चे संपादक प्रविण महाजन यांनी केले.

या कार्यक्रमाप्रसंगी पत्रकार संघाचे शहराध्यक्ष कैलास महाजन,पत्रकार राजीव ठक्कर,प्रा.सुधीर शिरसाठ,जावेद मुजावर, कुंदन ठाकूर,झुंजार चे ब्लॉगर प्रमोद चौधरी,राजधर महाजन,रतन अडकमोल,उमेश महाजन आदी उपस्थित होते.


Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*