Breaking

फकिरा खोकरे यांना शासनाचा डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज भुषण पुरस्कार प्रदान:, हा सन्मान माझा नाही तर एरंडोलचा – खोकरे


एरंडोल – येथील सामाजिक कार्यकर्ते श्री फकिरा पुरण खोकरे यांची सामाजिक कार्याची दखल घेत महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भुषण पुरस्कार जाहीर करण्यात आले होते.

सदर मुंबई येथील नरिमन पॉइंट नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्टस जमशेद भामा नाट्यगृहात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या उपस्थितीत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सचिव सुमंत भोगे व आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांच्या हस्ते फकिरा खोकरे यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज भुषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. ₹ १५ हजार, स्मृतीचिन्ह शाल, श्रीफळ आणि प्रशस्तीपत्रक असे या पुरस्काराचे स्वरूप होते.शासनाने  महाराष्ट्राचा मानाचा असलेल्या पुरस्कार देऊन सन्मान केला खरंतर हा सन्मान माझा नसून आमचा “एरंडोलचा” असे समाज भुषण फकीरा खोकरे यांनी यावेळी व्यक्त केले.पुरस्कार वितरण प्रसंगी क्रीडामंत्री नामदार संजय बनसोडे, आ.भरत गोगावले,आ. संजय सावकारे, आ.किशोर जोरगेवार आ.म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित होते. खोकरे यांना शासनाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*