भुसावळ (प्रतिनिधी) : भुसावळ शहर पुन्हा एकदा हादरले आहे. महामार्गांवरील जुन्या रस्त्यावर मरीमाता मंदिराजवळ पुलाजवळ दोघांची गोळ्या झाडून हत्त्या करण्यात आली आहे. जुन्या वादातून हा खून झाला असून पोलीस घटनास्थळी पोहचले आहेत.
भुसावळ शहरातील जुना सातारा परिसरात असलेल्या पुलाजवळ बुधवारी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास माजी नगरसेवक संतोष बारसे आणि सामाजिक कार्यकर्ते संतोष राखुंडे हे दोघे कार मध्ये बसलेले असताना दोघांवर अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडल्या. हल्ल्यात दोघांचा मृत्यू झाला असून त्यांना खाजगी रुग्णालयात नेण्यात आले आहे.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेतली असून सर्व वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि कर्मचारी रवाना झाले आहेत. जुन्या वादातून ही हत्त्या झाल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान कुणाच्या घटनेमुळे भुसावळ पुन्हा एकदा हादरले आहे भुसावळ शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक गजानन पडघन आणि त्यांचे सहकारी फरार संशयित आरोपींविषयी माहिती गोळा करीत आहेत.
Leave a Reply