एरंडोल – पिंगळवाडे ता अमंळनेर येथील रहिवासी आशा शरद पाटील वय (68) वर्षीय या हृदयविकाराचा आजाराने त्रस्त असलेल्या महिलेला एरंडोल येथील आरोग्य दूत विक्की खोकरे यांच्या प्रयत्नांमुळे हृदयाचा दोन शस्त्रक्रिया यशस्वी पार पडल्या व त्यांना जीवदान मिळाले
पिंगळवाडे येथील आशा पाटील यांना हृदयविकाराचा जास्त त्रास होऊ लागल्याने डॉक्टरांनी तपासणी केली असता व्हॉल रिप्लेसमेंट आणि बायपास असे हृदययाचे अश्या दोन मोठ्या शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला देण्यात आला ही शस्त्रक्रिया खर्चाचीच तर होतीच पण त्याच बरोबर अत्यंत जोखमीची सुद्धा होती त्यांचा मुलगा अतुल हा मदतीसाठी फिरत असताना एरंडोल येथील मुन्ना देशपांडे व विक्की खोकरे यांचा संपर्कात आला.
यावेळी खोकरे यांनी घोटी येथील एस एम बि टी हॉस्पिटलचे कार्डियाक सर्जन डॉ विद्युत कुमार सिन्हा यांच्याशी फोनवर चर्चा होऊन खोकरे यांनी थेट घोटी हॉस्पिटल गाठले व त्या ठिकाणी आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करून आशा पाटील यांना शासकीय योजनेचा लाभ मिळवून दिला डॉ विद्युत कुमार सिन्हा यांनी आशाबाई वर जोखमीची ह्दय शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली आता आशा बाई यांची तब्येतीत सुधारत होत आहे एकंदरीत आरोग्य दूत विक्की खोकरे यांच्या प्रयत्नामुळे या महिलेला जीवनदान मिळाले..
Leave a Reply