पारोळा – तालुक्यातील तीर्थक्षेत्र असलेल्या सांगवी येथील श्री दादाजी धुनिवाले प्रतिष्ठान तर्फे सालाबादप्रमाणे यंदाही गुरुपौर्णिमा उत्साह निमित्ताने सांगवी दरबार येथून ते मध्यप्रदेशातील खंडवा दादाजी धाम येथे पाय दिंडीचे आयोजन करण्यात येते सांगवी दरबार हुन सकाळी 5 वाजेला पाय दिंडीची सुरवात करण्यात आली.
सदर या पाय दिंडीचे एरंडोल शहरात भक्तिमय वातावरणात आगमन झाले असता येथील दादाजी भक्त परिवारातर्फे पाय दिंडीचे उत्साहात स्वागत करण्यात आले. सुरवातीला गुरु माऊली श्री सेवानंदजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.व पाय दिंडीत दादाजी भक्तांना अल्पहार म्हणून उपमा, मोतीचुर लाडू आणि गोड दुधाचे पाटप सपनांद उर्फ फकिरा भाऊ खोकरे, सुनिल भाऊ पाटील, अनिल भाऊ पाटील, आरोग्य दूत विक्की खोकरे यांच्या वाटप करण्यात आले शेकडो दादाजी भक्तांनी अल्पहाराचा लाभ घेतला तसेच प्रतिष्ठानचे जेष्ठ-श्रेष्ठ पदाधिकारी यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार देखील करण्यात आला.यावेळी सांगवी दरबार प्रतिष्ठानचे माजी अध्यक्ष दगा नाना पाटील, भगवान पाटील, गुलाब पाटील, भाऊ साहेब पाटील, मगन पाटील, सुभाष पुजारी, नवल मामा,सुनिल गांगुर्डे,राजू पाटील, संतोष नाईक, सोमा महाराज, सुभाष महाराज, मधुभाई, यांची उपस्थिती होती.
या पाय दिंडीला फकिरा खोकरे, सुनिल पाटील रवि सिंगोतिया, प्रा आर एस पाटील, अरुण साळी डॉ.ज्ञानेश्वर पाटील , जाबिरसेठ, लक्ष्मण सेठ सोमदानी , मुन्ना देशपांडे, गुलाब महाजन ,नितिन खोकरे, आमिन मुजावर,योगेश चौधरी,आदीचे अमनोल सहकार्य लाभले.
Leave a Reply