एरंडोल – येवला येथे कार्यरत असलेले मुख्याधिकारी तथा प्रशासक किरण देशमुख यांची एरंडोल नगरपरिषदला पुन्हा एकदा मुख्याधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली.
राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने बुधवारी रात्री उशिरा किरण देशमुख यांच्या बदलीचे आदेश काढले व गुरुवारी दि.25 जुलै रोजी एरंडोल येथे रिक्त झालेल्या जागेवर हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.किरण देशमुख यांनी या आधीही एरंडोल शहरात मुख्याधिकारी म्हणून काम पाहिले आहे. त्यांना कामाचा चांगला अनुभव आहे.
शहरात आता पुर्ण वेळ मुख्याधिकारी लाभल्याने नागरिकांच्या मूलभूत सुविधा बाबत असलेल्या समस्याचे प्रश्न लवकर मार्गी लागतील अशी अपेक्षा एरंडोलकरांनी दर्शविली आहे
Leave a Reply