Breaking

एरंडोल येथे अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आंदोलनाला शिवसेना (उबाठा)चा पाठिंबा


एरंडोल – नगरपरिषदे मार्फत सन २०२४-२५ साठी ची १५ टक्के करवाढीस स्थगिती मिळावी, सन २०२३-२४ मधे वसूल झालेला ६ कोटी रुपये कराच्या १५% म्हणजे ९० लक्ष रुपये नागरिकांना परत मिळावे तसेच न पा हद्दीतील खरेदी-विक्रीवर आकारला जाणारा १ टक्के कर रद्द करण्यात यावा या मागणीसाठी सत्तारूढ महायुतीतील घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे शहराध्यक्ष गोरख चौधरी यांच्या उपोषणास शिवसेना (उबाठा) पक्षाने जाहीर पाठिंबा दिला आहे.

याप्रसंगी बोलताना उपजिल्हाप्रमुख माजी नगराध्यक्ष दशरथ महाजन यांनी राज्य सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले एकीकडे शासन लाडकी बहीण योजनेचा लाभ महिलांना देत असताना दुसरीकडे नागरिकांवर अतिरिक्त १५% करवाढ लादून अन्याय करत आहे स्थानिक स्वराज्य संस्थेवर लोकप्रतिनिधी नसताना नागरिकांच्या हरकतींचा कोणताही सकारात्मक विचार न करता न पा प्रशासनाने एकतर्फी निर्णय घेऊन ही जुलमी करवाढ नागरिकांवर लादली आहे.

त्याचप्रमाणे मालमत्ता खरेदी-विक्री वर लागणारा १ टक्के कर देखील नगरपालिका प्रशासन वसूल करत आहे… एकीकडे आमदार चिमणराव पाटील पारोळा नगरपरिषदेच्या करवाढीस मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून तात्काळ स्थगिती मिळवून आणतात तर दुसरीकडे एरंडोल वासियांकडे पूर्णतः दुर्लक्ष करतात हे त्यांचे पुतना मावशीचे प्रेम आहे का ? असा संतप्त सवाल त्यांनी केला… माजी जि प सदस्य नानाभाऊ महाजन यांनी राज्य सरकारच्या घटक पक्षावर उपोषण करण्याची वेळ येत असेल तर सामान्य नागरिकांची दखल कोण घेणार असा सवाल केला. लोकप्रतिनिधी जर असा भेदभाव करत असतील तर जनता येणाऱ्या काळात त्यांना त्यांची जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही असा इशारा देखील त्यांनी दिला.

याप्रसंगी जिल्हाप्रमुख डॉ. हर्षल माने, समन्वय समितीचे माजी अध्यक्ष रमेश महाजन, उपजिल्हाप्रमुख दशरथ महाजन, माजी जि प सदस्य नानाभाऊ महाजन, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस राजेंद्र शिंदे, शिवसेना विधानसभा क्षेत्र प्रमुख जगदीश पाटील, तालुकाप्रमुख रवींद्र चौधरी, युवासेना जिल्हा समन्वयक अतुल महाजन, शिवसेना शहरप्रमुख प्रमोद महाजन, शहर प्रमुख सुनील चौधरी, माजी उपनगराध्यक्ष संजय महाजन, कासोदा शहर प्रमुख समाधान चौधरी, युवासेना तालुकाप्रमुख गुलाबसिंग पाटील, उपतालुकाप्रमुख रेवानंद ठाकूर, माजी नगरसेवक सुभाष मराठे, विभाग प्रमुख गुड्डू चौधरी, शिवदूत निलेश अग्रवाल, युवासेना शहरप्रमुख जयेश महाजन, राजेंद्र ठाकूर, गजानन महाजन, गोपाल महाजन, संदीप पाटील, महेश महाजन, सुनील मराठे, रवींद्र पाटील, रवींद्र चौधरी, भरत महाजन, काशिनाथ पाटील, हेमंत पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.


Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*