एरंडोल – गणेश उत्सवासह सर्व सण व उत्सव सामाजिक सदभावना राखून शांततेत साजरा करण्याची एरंडोल शहराची परंपरा यावर्षी गणेशोत्सवात सुध्दा कायम राखावी असे आवाहन अप्पर पोलीस अधिक्षक कविता नेरकर यांनी शांतता समितीच्या बैठकी प्रसंगी केले.यावेळी जिल्हा उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील नंदवाडकर यांची उपस्थिती होती.
एरंडोल येथे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिस स्टेशन तर्फे शांतता समितीची बैठक ३१ ऑगस्ट २०२४ रोजी नगरपालिका मिटिंग हॉल मध्ये घेण्यात आली.त्यावेळी कविता नेरकर ह्या अध्यक्षपदावरून बोलत होत्या.
यावेळी उपस्थित शांतता समितीच्या सदस्यांनी गणेश उत्सव शांततेत साजरा करण्यासाठी चर्चेत भाग घेतला.तसेच श्री विसर्जन मिरवणूक वेळेचे बंधन पाळून शांततेत पार पाडावी अशी सुचना पोलिस प्रशासनातर्फे करण्यात आली.या सुचनेस सर्वांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
या बैठकीस माजी नगराध्यक्ष देविदास महाजन, रमेश परदेशी, रमेश महाजन,राजेंद्र चौधरी,विजय महाजन, रविंद्र महाजन, अशोक चौधरी, शालिग्राम गायकवाड, जगदीश ठाकूर, कुणाल महाजन, ॲड.अहमद सय्यद, अल्ताफ खान पठाण आदी शांतता समितीचे सदस्य उपस्थित होते.
प्रास्ताविक पोलिस निरीक्षक सतीश गोराडे यांनी केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन मिलिंद कुमावत यांनी केले. तर आभार प्रदर्शन अनिल पाटील यांनी केले.
Leave a Reply