एरंडोल – येथील बाल शिवाजी प्राथमिक विद्यामंदिरात पाच सप्टेंबर रोजी डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त विविध स्पर्धेचे आयोजन करत शिक्षक दिन साजरा करण्यात आला.
स्पर्धा प्रमुख छाया पाटील यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.यावेळी उपशिक्षिका दिपाली जाधव यांच्या हस्ते डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
उपस्थित विद्यार्थ्यांना शिक्षक दिनाचे महत्व काय आहे यांची माहिती देण्यात आली. तसेच स्पर्धेत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर सर्व शिक्षकवृंदांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आले.यावेळी निलीमा मराठे,नलिनी भावसार,योगिता बनसोडे, व शिक्षकवृंद उपस्थित होते. हेमराज बडगुजर यांनी सूत्रसंचालन केले तर आभार प्रदर्शन मंगला पाटील यांनी मानले.
Leave a Reply