Breaking

एरंडोल येथे गुलालाची उधळण व ढोल ताशांच्या गजरात गणपती बाप्पा ला निरोप..!


एरंडोल: गुलालाची उधळण व ढोल ताशांच्या निनादात मंगळवारी रात्री १८ सार्वजनिक गणेश मंडळांनी कासोदा दरवाजा परिसरात अंजनी नदीपात्रात गणपती विसर्जन करुन बाप्पा ला निरोप देण्यात आला. विसर्जन मिरवणुकीत १८ सार्वजनिक गणेश मंडळांनी सहभाग घेतला.

सायंकाळी विसर्जन मिरवणुकीस प्रारंभ झाला. मिरवणुकीच्या अग्रभागी जयगुरू व्यायाम शाळेचा मानाचा गणपती होता.गणेश मंडळांचे कार्यकर्ते वाद्यांच्या तालावर थिरकत होते. अमळनेर दरवाजा,नागोबा मढी, मोठा माळी वाडा,मेन रोड,भगवा चौक मार्गे गणपती विसर्जन मिरवणूक काढण्यात आली. दरम्यान मेनरोड वर सामाजिक कार्यकर्ते भगवान महाजन तसेच शिवसेना उ.बा.ठा गटाचे जिल्हा उपप्रमुख दशरथ महाजन यांच्या तर्फे गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले.

एरंडोल न.पा. तर्फे जून्या कार्यालयानजिक सर्व मंडळांच्या मुर्त्यांचे पुजन करुन पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी उपविभागीय अधिकारी मनिषकुमार गायकवाड,नवनियुक्त तहसिलदार प्रदीप पाटील,नायब तहसीलदार संजय घुले, नगरपालिकेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी किरण देशमुख, अरुण माळी,देविदास महाजन, डॉ. राहूल वाघ, शालिग्राम गायकवाड,न.पा.अधिक्षक विनोद पाटील,जगदीश ठाकूर,अमित पाटील,अभिजित पाटील, डॉ.सुरेश पाटील,गजानन पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

पोलिस उपविभागीय अधिकारी सुनील नंदडवारकर यांच्या मार्गदर्शनाखाली निरिक्षक सतीश गोराडे,स.पो.नि शंकर पवार, उपनिरिक्षक शरद बागल,विकास देशमुख,पो.कॉ.राजेश पाटील,अनिल पाटील, मिलिंद कुमावत,संदीप पाटील,गणेश पाटील यांनी चोख बंदोबस्त ठेवला.डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान तर्फे निर्माल्य संकलनाचा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाचा शुभारंभ प्रांताधिकारी मनिषकुमार गायकवाड यांनी केला. यावेळी माजी नगराध्यक्ष रमेश परदेशी हे उपस्थित होते.


Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*