दुर्गेश खोकरे – एरंडोल ( प्रतिनिधी ) येथील मानव सेवा बहुउद्देशीय संस्था एरंडोल यांचे वतीने १७ सप्टेंबर २०२४ रोजी मंगळवारी सामाजिक कार्यकर्ते तथा महाराष्ट्र शासन पुरस्कृत समाज भुषण फकिरा खोकरे याचे मार्गदर्शनाखाली गणेश विसर्जन मिरवणुकीच्या ड्युटीवर असलेल्या पोलीस व होमगार्ड कर्मचाऱ्यांना जेवणाचे पॅकेटस व पाण्याच्या बाटल्यांचे वाटप करण्यात आले.
या बाबत संस्थेचे अध्यक्ष तथा आरोग्य दूत युवराज (विक्की) खोकरे यांनी भावना व्यक्त करतांना सांगितले की ‘ पोलीस कर्मचारी हे सणासुदीला दिवस रात्र ड्युटी वर असतात. सर्व लोक सण,उत्सव साजरे करीत असतांना ते उपाशीपोटी आपले कर्तव्य बजावित असतात. त्यांच्या या कर्तव्य भावनेचा सन्मान म्हणून संस्थेतर्फे ड्युटीवरील सर्व पोलीस कर्मचारी यांना जेवणाचे पॅकेट व पाण्याच्या बाटल्या मोफत वाटण्यात आल्या.
यावेळी संस्थेचे दहा ते बारा स्वयंसेवक स्वतः कर्मचाऱ्यांना त्यांच्या कर्तव्याच्या ठिकाणी जाऊन ही सेवा देण्यात आली . तसेच संस्थेच्या स्वयंसेवकांतर्फे बंदोबस्तासाठी आवश्यक ती मदत देखील करण्यात आली.संस्थेने राबवलेला हा उपक्रम अतिशय स्तुत्य असून यापूर्वी देखील संस्थेच्या माध्यमातून आरोग्यसेवा,रूग्णांसाठी ॲंब्युलन्स सेवा, मोफत पाणपोई या सारखे सामाजिक उपक्रम राबविण्यात आलेले आहेत. विशेष म्हणजे या उपक्रमांसाठी ते कोणाकडूनही देणग्या घेत नाहीत . संस्थेतर्फे राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांसाठी ते स्वत:च खर्च करीत असतात. मानव सेवा हीच ईश्वर सेवा ही भावना संस्था चालकांची असून संस्थाध्यक्ष विक्की खोकरे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.सदर उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थाध्यक्ष विकी खोकरे यांच्यासह अरुण भाऊ साळी,प्रा. आर. एस. पाटील, नितिन खोकरे, दुर्गेश खोकरे, सागर कोळी, मनोज खोकरे, सागर झांबरे,कृष्णा महाले, निखिल खोकरे,राहुल झांबरे आदींनी विशेष परिश्रम घेतले.
Leave a Reply