Breaking

नवीन वसाहती संघर्ष समितीच्या समस्या सोडवण्यासाठी सदैव कटिबद्ध – भगवान भाऊ महाजन


एरंडोल – एरंडोल शहर नवीन वसाहती संघर्ष समितीचे कार्य समाजाला प्रेरणा देणारे असून समितीच्या ज्याही काही समस्या असतील त्या सोडवण्यासाठी मी सदैव कटिबद्ध असेन अशी ग्वाही हिमालया पेट्रोल पंपाचे संचालक भगवान भाऊ महाजन यांनी दिली. ते येथील नवीन वसाहती संघर्ष समितीच्या फलक अनावरण प्रसंगी अध्यक्षपदावरून बोलत होते.यावेळी प्रमुख अतिथी म्हणून निवृत्त तहसीलदार अरुण माळी, भानुदास पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी श्री भगवान भाऊ महाजन यांचा शाल श्रीफळ देऊन समितीचे अध्यक्ष निवृत्ती केंद्रप्रमुख रवींद्र लाळगे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तर सूर्योदय ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष अरुण माळी यांचा सत्कार एडवोकेट दिनकर पाटील यांनी केले.

यावेळी समितीचे उपाध्यक्ष नामदेव धुडकू पाटील यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. याप्रसंगी विकास देशमुख, किशोर मोराणकर, विजय देशमुख श्री गोरे, पितांबर महाजन ,विनायक विंचुरकर यांच्यासह समितीचे कायदेशीर सल्लागार एडवोकेट दिनकर पाटील, संस्थेचे सचिव शिक्षक स्वप्निल सावंत, आर झेड पाटील, सदस्य चंद्रकांत बाविस्कर, तुकाराम पाटील , प्रमोद महाजन, नाना मिस्त्री, प्रकाश पाटील, महात्मा फुले हायस्कूल चे माध्यमिक शिक्षक दिनेश चव्हाण,एडवोकेट अजिंक्य काळे आदि उपस्थित होते.

धरणगाव चौफुली येथे संपन्न झालेल्या फलक अनावरण कार्यक्रमाप्रसंगी भगवान भाऊ महाजन यांचे फटाक्यांच्या आतिश बाजीत जल्लोषात स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे आभार समितीचे प्रसिद्ध प्रमुख प्रवीण महाजन यांनी मानले.


Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*