एरंडोल – विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी एरंडोल मतदारसंघात जनरल निवडणूक निरीक्षक म्हणून ब्रिजेश कुमार यांची नियुक्ती केली आहे. त्यांनी एरंडोल येथे पंचायत समितीच्या सभागृहात आढावा बैठक घेतली. त्यात निवडणूक कामाचा आढावा घेतला.
त्यात प्रामुख्याने अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून आतापर्यंत निवडणुकीच्या अनुषंगाने केलेल्या कामाची माहिती घेतली. तसेच मतदारसंघातील आचारसंहिता अंमलबजावणी, कायदा -सुव्यवस्था अंमलबजावणी, खर्च व्यवस्थापन, मतदार जनजागृतीसह मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी करावयाच्या उपाययोजना इत्यादी बाबतचा आढावा घेऊन मार्गदर्शनही केले.याप्रसंगी FST टीम, SST टीम, VST टीम, VVT टीम, नोडल ऑफीसर, सेक्टर ऑफिसर यांच्याशी व्यक्तिशः चर्चा करून त्यावरही मार्गदर्शनही केले. एकंदरीत विधानसभा सार्वत्रिक निवडणूक संदर्भात म. निवडणूक निरीक्षक यांनी समाधान व्यक्त केले.
यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी मनीष गायकवाड, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, तथा एरंडोल तहसिलदार प्रदीप पाटील सहायक निवडणूक निर्णय अधिकारी पारोळा तहसीलदार उल्हास देवरे ,सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी अमोल बागुल तसेच माननीय निवडणूक निरीक्षक यांचे समन्वय अधिकारी, बाविस्कर उपविभागीय अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग, पारोळा हे उपस्थित होते.
Leave a Reply