संकलन: संजय जाधव एरंडोल
.- सुमारे ५० वर्षांपूर्वी (आमच्या लहानपणी) आमच्या आजोबांचे सोनार कामाचे दुकान होते. सोने-चांदी तराजूत मोजताना त्याकाळी ग्रामीण भागात धातुच्या वजन मापांना फारसे महत्त्व नव्हते, किंबहुना धातूची वजनं उपलब्ध नसायची… तर तराजूत गुंजा ठेवून वजन करायचे.
यात “गुंज” नावाच्या बिया असतात.
या लाल गुंजा सोनार लोक वजनासाठी वापरायचे.
यांना हिंदीत “रत्ती” असे म्हणतात.
८ गुंजांचा एक मासा (आताचा ग्रॅम)
१२ माशाचा एक भार(आताचा तोळा)
५ भाराचा एक छटाक( आताचे ५० ग्रॅम)
१६ छटाक चा एक शेर
२ शेराची एक आधली
२ दोन आधल्यांचे एक चवथे (७ किलो)
४ चवथ्यांची एक पायली (२८ किलो)
१.५ पायलीचा एक मण (४० किलो)
५ मणाचे एक माप ( दोन पोते… २०० किलो)
तेव्हा अशी मापं आपल्या खांदेशात होती.
Leave a Reply