एरंडोल प्रतिनिधी – एरंडोल पारोळा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार डॉ हर्षल माने (पाटील) यांच्या प्रचाराला एरंडोल तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. वनकोठे, कासोदा,आडगाव, पिंपरखेड, वरखेड या गावी डॉ हर्षल माने यांच्या प्रचार मोर्चाने जल्लोषाचे वातावरण निर्माण केले आहे. गावोगावी ढोल ताशांच्या गजरात दादांचे जोरदार स्वागत होत आहे ते मतदारांशी संवाद साधत आहे, या परिसरातील नागरिकांनी डॉ हर्षल दादांच्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास ठेवत त्यांना भरभरून पाठिंबा देत आहे.
प्रचार रॅलीत नेते, स्थानिक कार्यकर्ते, आणि समर्थकांनी एकत्र येऊन जोरदार घोषणाबाजी केली. “हर्षल दादा तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ हैं” अशा घोषणा तालुक्यात घुमू लागल्या. दरम्यान अनेक महिलांनी डॉ हर्षल माने यांचे औक्षण केले, फुलांचा वर्षाव करत त्यांना आशिर्वाद दिला.या प्रचाराच्या निमित्ताने एरंडोल तालुक्यातील निष्ठावान शिवसैनिक व विविध समाजघटक यांना साथ देण्यासाठी एकवटले आहेत. हर्षल दादांच्या नेतृत्वाखाली एरंडोल पारोळा मतदारसंघात विकासाला चालना मिळेल, असा विश्वास अनेकांनी व्यक्त केला
Leave a Reply