Breaking

एरंडोल मतदारसंघात डॉ.संभाजीराजे पाटील यांना जनतेचा भरीव पाठिंबा


एरंडोल- विधानसभा मतदार संघात अपक्ष म्हणून उमेदवार तथा आरोग्य नायक डॉ.संभाजीराजे पाटील यांना तालुक्यातील गावागावातून स्फुर्त असा प्रतिसाद मिळत आहे गेल्या दोन ते अडीच वर्षांपासून मतदार संघात जनतेशी चांगला संपर्क ठेवला असून त्यांनी मतदार संघातील दोन तालुके व एका जिल्हा परिषद गटात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.त्याचबरोबर वैद्यकीय क्षेत्रात काम करणारे व मानव सेवा हीच ईश्वर सेवा असे समजणारे व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांना ओळखले जाते. आतापर्यंत डॉ. संभाजीराजे फाउंडेशनच्या मार्फत असंख्य मोतीबिंदूचे ऑपरेशन फ्री मध्ये करण्यात आलेले आहेत तसेच कोरोना काळात जवळपास तीन ते चार हजार पर्यंत गरोदर महिलांची मोफत डिलेव्हरी केलेल्या आहे म्हणून जनतेचा साथ व आशीर्वाद मोठया प्रमाणात त्यांना मिळत आहे हाच वाढता प्रतिसाद बघून आज एरंडोल, कासोदा,पारोळा,मतदार संघातील विरोधकांना धडकी भरल्याचे चिन्ह समोर येत आहे.सर्वसामान्य जनतेच्या मनातले आमदार डॉ.संभाजीराजे पाटील यांना बघण्याची लोकांची भूमिका असून सर्वसामान्य जनतेत व मतदार संघात मोठ्या प्रमाणात बोलले जात आहे…


Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*