Breaking

प्रांतधिकाऱ्यावर भ्याड हल्ल्याचा निषेध करत महसूल कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन..


प्रतिनिधी – एरंडोल येथील महसूल कर्मचारी संघटनेतर्फे तहसिलदार सुचिता चव्हाण यांना निवेदन देऊन प्रांताधिकारी मनीष कुमार गायकवाड व त्यांच्या सहकाऱ्यांवर अवैध वाळू तस्करांनी हल्ला केल्याने संबंधित आरोपींना त्वरित अटक व्हावी व त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई व्हावी अशी मागणी केली आहे.काही दिवसांपूर्वी एरंडोल प्रांताधिकारी मनीष कुमार गायकवाड व त्यांच्या सहकाऱ्यांवर अवैध वाळू तस्करांनी हल्ला केला होता तसेच यावरुन त्यांची मुजोरी वाढलेली असुन यापूर्वी देखील जळगाव प्रांताधिकारी यांचेवर त्यांनी प्राणघातक हल्ला केला असल्याचे निवेदनात म्हटले आहे व त्यांची दिवसेंदिवस हिंमत वाढत असून यामुळे महसूल अधिकारी व कर्मचारी यांच्या जीवितास धोका निर्माण झालेला असल्याचे म्हटले आहे त्यामुळे एरंडोल प्रांताधिकारी व कर्मचाऱ्यांवर हल्ला करणाऱ्या अवैध वाळू तस्करांना त्वरित अटक करून कठोरात कठोर कारवाई व्हावी व एरंडोल तालुक्यातील अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूक करणाऱ्या पथकास कारवाई साठी जातांना कायम स्वरुपी पोलीस संरक्षण मिळावे अशी विनंती करण्यात आली आहे.

निवेदनावर संघटनेचे तालुकाध्यक्ष मुकेश जाधव,तालुका सचिव मधुकर नंदनवार,तालुका कोषाध्यक्ष ज्योती चौधरी, योगेश्री तोंड,धनश्री संत,सुयोग कुलकर्णी एम.आर.सुतार जी.एम.शिरसाठ, एस.व्ही.भोसले ,अनिता रणदिवे,राजेंद्र याज्ञिक,जे.वी.ढमाले,नितीन सैंदाणे,राजेंद्र वाघ,मनोहर राजिंदे तर तलाठी संघटनेचे सदानंद मुंडे,सलमान तडवी,सुरेश कटारे,विनायक मानकुंबरे,उदय निंबाळकर,अनिल सुरवाडे , शकील शेख,सुधीर मोरे,विश्वंभर शिरसाठ,विलास धाडसे,दिपक ठोंबरे,सागर कोळी,अतुल तागडे,बालाजी लोंढे,नितीन पाटील व सुवर्णा काळे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.


Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*