एरंडोल – येथील आरोग्य दूत विकी खोकरे यांना अहमदनगर येथे शिर्डी एक्स्प्रेस वृत्तपत्राच्या वर्धापन दिनानिमित्त नुकताच त्यांच्या आरोग्य व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी राज्यस्तरीय’ महाराष्ट्र रत्न पुरस्कार ‘ पद्मश्री पोपटराव पवार यांच्या हस्ते समारंभ पुर्वक प्रदान करण्यात आला.यावेळी शिर्डी एक्सप्रेसचे संपादक रमेश जेठे सर, जेष्ठ पत्रकार मनोजकुमार आगे, कृषीतज्ञ डॉ बबन जोगंदडे यांचा सह विविध मान्यवर उपस्थित होते.
विक्की खोकरे यांनी दुर्धर आजाराने ग्रस्त असलेल्या हजारो रूग्णांना तत्परतेने आरोग्य सेवा पुरवून त्यांना मृत्यूच्या दाढेतून मुक्त केले आहे. ते नेहमी पिडीत रुग्णांच्या मदतीला अहोरात्र झटत असतात. आपल्या कार्यातून समाजाला प्रेरणा व नवी दिशा देणारे दीपस्तंभ ठरतात.त्यांच्या आरोग्य क्षेत्रातील मोलाच्या कामगिरीचे मुल्यमापन करून त्यांना ‘महाराष्ट्र रत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.या सन्मानाबद्दल विक्की खोकरे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Leave a Reply