पारोळा प्रतिनिधी – अयोध्येत प्रभू श्रीराम यांची २२ जानेवारीला प्राणप्रतिष्ठा होत आहे. त्या पार्श्वभूमीवर पारोळ्यातील श्री मोठे राम मंदिर संस्थान ८० फुट रांगोळीतून अयोध्येतील श्रीराम मंदिराची भव्य प्रतिकृती साकारणार असून प्रतिकृतीला ५ हजार दिव्यांचा लखलखाटाचा साज चढणार आहे.
अयोध्येत प्रभू श्रीराम यांची २२ जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, सरसंघचालक मोहन भागवत यांच्या प्रमुख उपस्थितीत प्राणप्रतिष्ठा होत आहे. त्या पार्श्वभूमीवर नानाविध उपक्रम, कार्यक्रमातून देशभरात श्रीराम भक्तीचा जागर करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून पुरातन श्री मोठें राम मंदिर संस्थानच्या वतीने मंदिराच्या प्रांगणात तब्बल ८० बाय ५० फूट एवढी भव्य रांगोळीतून अयोध्यातील निर्माणाधिन श्रीराम मंदिराची प्रतिकृती २२ रोजी साकारण्यात येणार आहे. एवढ्या व्यापक स्वरूपात पारोळ्यात पहिल्यांदाच रांगोळी साकारण्यात
येणार आहे. त्यामुळे हा नवा विक्रम होणार आहे.
खान्देशा तील सुप्रसिद्ध रांगोळी कार अमळनेर येथील नितीन भदाणे ही प्रतिकृती साकारणार आहेत. या प्रतिकृतीमध्ये ५ हजार दिवे ठेवले जाणार आहेत. यामुळे ५ हजार दिव्यांचा लख्ख प्रकाशाचा साज प्रतिकृतीला चढणार आहे. त्यासोबतच सकाळी पुजारी श्री हरी नारायण मिश्रा व ११ ब्राम्हण द्वारे रुद्र अभिषेक, सुंदरकांड, भक्तीसंगीत, आरती,भक्तांना प्रसाद वाटप होणार आहे .
२.एलईडीद्वारे अयोध्येतील कार्यक्रम पाहण्यासाठी राम मंदिरात व्यवस्था करण्यात येणार आहे. मंदिरावर विद्युत रोषणाई करण्यात येणार असून खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी केली जाणार असुन भाविकांनी उपस्थित रहावे. संस्थानचे अध्यक्ष गोपाल अग्रवाल, विश्वस्त कल्पेश अग्रवाल, अर्जुन भोसले, ॲड.दत्ताजी महाजन, डॉ.अनिल गुजराथी यांनी सांगितले.
Leave a Reply