Breaking

विखरण येथे श्री संत शिरोमणी सेना महाराज पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी


एरंडोल – विखरण येथे  सालाबादप्रमाणे यंदाही नाभिक समाज बांधवांतर्फे श्री संत शिरोमणी सेना महाराज यांची पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.सकाळी नऊ वाजता रवींद्र ओंकार पवार यांच्या घरी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले.दुपारी बारा ते तीन पर्यंत नाभिक समाज बांधवां तर्फे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच रात्री हरिभक्त परायण चंद्रकांत महाराज आर्थेकर यांचे जाहीर कार्यक्रमाला धार्मिक व सांस्कृतिक व सामाजिक उंची प्राप्त झाली.

हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी समाजबांधव आत्माराम वारुळे ,जयराम पवार ,रोहिदास सोनवणे ,अरुण पवार ,बळीराम पवार ,शालिक पवार , पत्रकार देविदास सोनवणे ,बारकू सोनवणे ,रवींद्र पवार, भैया पवार, भैया वारुळे ,गबजी सोनवणे ,गोरख खोंडे, गोविंदा पवार, श्रीराम वारुळे ,भूषण पवार ,गौरव पवार, लीलाधर सोनवणे ,हर्षल पवार, राज सोनवणे ,पांडू येशी यांचासह  नाभिक समाजाच्या सर्व महिला उपस्थित होते. गावातील ग्रामस्थांच्या सहकार्याने श्री संत शिरोमणी सेना महाराज पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली


Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*