Breaking

शास्त्री फार्मसी मध्ये राष्ट्रीय युवा दिवस साजरा..


एरंडोल  : १२जानेवारी २०२४ शुक्रवार रोजी राष्ट्रीय युवा दिवस व राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीचे औचित्य साधून घेतलेल्या कार्यक्रमात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून या दोघी महान व्यक्तींची विचार श्रेणी आचरणात आणावी असे मत उपप्राचार्य श्री.डॉ.पराग कुलकर्णी यांनी सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत मांडले.

या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष व प्राचार्य डॉ.विजय शास्त्री व संस्थेच्या सचिव सौ.रूपा शास्त्री यांचे मार्गदर्शन लाभले . कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जावेद शेख व समस्त प्राध्यापक वृंद तसेच संस्थेचे जनसंपर्क अधिकारी शेखर बुंदेले यांनी प्रयत्न केले.


Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*