एरंडोल – येथे गणेशोत्सव व ईद ए मिलाद हे दोन्ही सण शातंतेत पार पाडावेत यासाठी एरंडोल पोलीस स्टेशन तर्फे २५ ऑगस्ट २०२५ रोजी शांतता समितीची बैठक घेण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष देविदास महाजन हे होते. एरंडोल शहराची जातीय सलोखा व बंधुभावाची अनेक वर्षांपासूनची परंपरा याही वर्षी कायम राखण्याबाबत निर्धार व्यक्त करण्यात आला.
एरंडोल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड यांनी कायदा व सुव्यवस्थेबाबत सविस्तर माहिती दिली.यावेळी सेवानिवृत्त तहसीलदार अरूण माळी, रमेश महाजन, विजय महाजन,जगदीश ठाकूर, रविंद्र महाजन, राजेंद्र चौधरी, शालिग्राम गायकवाड, किशोर निंबाळकर,महावितरणचे उप कार्यकारी अधिकारी रामपाल गेडाम, नगरपालिकेचे कार्यालय अधीक्षक एस.आर.ठाकूर,परेश बिर्ला,स.पो.नि गबाले,एजाज अहमद,कैलास महाजन, आरीफ मिस्तरी,पंकज महाजन,कमर अली सय्यद,उमेश महाजन,जावेद मुजावर आदी मान्यवर, गणेश मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते. प्रास्ताविक अनिल पाटील यांनी केले.सुत्रसंचालन मोहन चव्हाण यांनी केले.

Leave a Reply