एरंडोल (प्रतिनिधी) – येथील ज्येष्ठ डॉ. के. ए. बोहरी यांनी ५० वर्षांपासून वैद्यकीय व्यवसाय सुरू ठेवला असून त्यांचेकडे ३७ वर्षांपासून (१९८८) दरवर्षी गणेशाची स्थापना केली जात आहे. तसेच पोळा सण देखील साजरा केला जात आहे. डॉ. के. ए. बोहरी आणि त्यांच्या सौभाग्यवती सौ. डॉ. एन. के. बोहरी या जोडप्याने शहर आणि परिसरात नावलौकिक मिळविला आहे. त्यांनी ५० वर्षे सेवा (वैद्यकीय) केली असून त्यांचे चिरंजीव डॉ. फरहाज बोहरी यांना लहान पणापासूनच गणेशोत्सवाची आवड असल्याने १९८८ पासून दरवर्षी गणेश स्थापना केली जाते. नियमितपणे आरती, प्रसाद केला जातो. यंदाचे ३७ वे वर्ष असून यावर्षी देखील दि. २७ रोजी विधीवत स्थापना करण्यात आली.
यावेळी दवाखान्यातील कर्मचारींसह डॉ. जीवन पाठक, अॅड. मोहन शुक्ला, सौ. नंदा शुक्ला, प्रा. शिवाजीराव अहिरराव, सौ. शकुंतला अहिरराव, गोपाल पाटील, मीना पवार, पत्रकार आल्हाद जोशी, समाधान बडगुजर, समाधान पाटील, अशोक भवार, डॉ. फरहाज बोहरी, डॉ. अंबरीन बोहरी यांचेसह दोन्ही मुली आदी उपस्थित होते.
डॉ. अंबरीन बोहरी यांचे हस्ते पोळ्याच्या दिवशी बैलांची पुजा करून गोड पुरणपोळी खाऊ घातली हे विशेष. डॉ. बोहरी परिवाराने जातीय सलोखा कायम राखला असून सर्वत्र त्यांचे कौतूक केले जात आहे. घेतलेला वसा सोडणार नाही हा संकल्प केला आहे.

Leave a Reply