एरंडोल – अकोला येथे गुलजार पुरा भागात भोई समाजाच्या १३ वर्षाच्या अल्पवयीन निरागस मुलीवर गुन्हेगारी प्रवृत्तीच्या गुंड तोहीत समीर या व्यक्तीने अमानुष अत्याचार केल्याचा येथील भोई समाजातर्फे तीव्र धिक्कार करण्यात आला आहे.या संदर्भात भोई समाजातर्फे तहसीलदार प्रदीप पाटील यांना १२ सप्टेंबर २०२५ रोजी निवेदन देण्यात आले.फरार आरोपीचा शोध घेऊन त्याचा पोलीसांनी एन्काऊंटर करावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
निवेदन देताना राष्ट्रीय भोई एकता संघाचे अध्यक्ष अशोक मोरे, माजी नगरसेवक शेनपडू वाल्डे, नरेश भोई, उखर्डू वाल्डे, पी.डी.मोरे, गोविंदा वाल्डे, किशोर भोई, विलास वाल्डे आदी भोई समाज बांधव उपस्थित होते.

Leave a Reply