Breaking

चक्क दोन थकबाकीदारांनी केला 81 हजार 910 रुपयांचा भरणा ;एरंडोल येथील लोकअदालतीत झाला भरणा


एरंडोल – येथे दिवाणी न्यायालयात १३ सप्टेंबर २०२५ रोजी लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले.त्यामध्ये महसूल विभागाकडील एकूण २१७ थकीत वसुलीची प्रकरणे तसेच शेतरस्ता मागणी व वहिवाट रस्त्यांची प्रकरणे तडजोडी करीता ठेवण्यात आली.त्यामधील एका वहिवाट प्रकरणात दोन्ही पक्षकारांमध्ये तडजोड बाबत सकारात्मक चर्चा झाली व दोन्ही थकबाकीदारांकडे असलेली थकबाकी ८१ हजार ९१० रूपये एवढ्या रकमेचा भरणा करण्यात आला.

इतर मागासवर्ग मंडळाकडील आडगांव येथील एकूण ११ कर्जवसुली प्रकरणांमध्ये ५ शेतकऱ्यांनी महामंडळाकडील थकबाकी वसुलीसाठी सहमती दर्शवली.या लोकअदालतीत तहसीलदार प्रदीप पाटील, निवासी नायब तहसीलदार संजय घुले, सहाय्यक महसूल अधिकारी मधुकर नंदनवार,धनश्री संत, महसूल सहाय्यक जगदीश धमाले तसेच क्षेत्रीय स्तरावरील सर्व मंडळ अधिकारी व ग्राम महसूल अधिकारी उपस्थित होते.


Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*