Breaking

आदिवासी समाजाच्या राखीव प्रवर्गात इतर कोणत्याही जातीचा व समाजाचा समावेश करू नका ; एकलव्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे प्रांताधिकाऱ्यांसह तहसीलदारांना निवेदन


एरंडोल – आदिवासी समाजाच्या राखीव प्रवर्गात इतर कोणत्याही जातीचा व समाजाचा समावेश करू नये.अशी मागणी करण्यासंदर्भात एकलव्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी १५ सप्टेंबर २०२५ रोजी उपविभागीय अधिकारी मनीषकुमार गायकवाड व तहसीलदार प्रदीप पाटील यांना दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.आदिवासी समाजाच्या राखीव प्रवर्गात बेकायदेशीर घुसखोरी करणारे तसेच शासनावर दबाव टाकून अनुसूचित जमातीमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या कोणत्याही समाजाला अथवा जातीला आदिवासी समाजाच्या राखीव प्रवर्गात समाविष्ट करण्यात येऊ नये.असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. अन्यथा एकलव्य संघटनेतर्फे उग्र आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.

निवेदन देतांना एकलव्य संघटनेचे रावेर लोकसभा जिल्हाध्यक्ष निवृत्ती पवार, अपंग सेलचे जिल्हाध्यक्ष ऋषी सोनवणे, जिल्हाध्यक्ष भिवसन सोनवणे,जिल्हा संघटक पिंटू सोनवणे, जिल्हा सल्लागार भोलानाथ महाले, जिल्हा युवा संघटक सुभाष मालचे, एरंडोल तालुकाध्यक्ष वाल्मिक सोनवणे,युवा तालुकाध्यक्ष जय मोरे, तालुका उपाध्यक्ष राहुल सोनवणे, टायगर फोर्सचे तालुका उपाध्यक्ष प्रवीण पवार,दिलीप मोरे, अशोक मोरे,भरत सोनवणे,निशांत सोनवणे,करण सोनवणे, मोतीराम जावळे व आदिवासी समाज बांधव उपस्थित होते.


Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*