Breaking

एरंडोल शहराचा काही भागांना अवघ्या 5 तासात वीजपुरवठा ; वीज वितरण यंत्रणेचे शहर अभियंता रवींद्र पाटील यांचे शहरवासीयांनी मानले आभार


एरंडोल – येथे सोमवारी मुसळधार पाऊस झाल्यामुळे अंजनी नदीला मोठा पूर आला.पुराच्या प्रवाहाचे पाणी नदीपात्राच्या बाहेर प्रवाहीत झाले.त्या पुराच्या पाण्यात आठवडे बाजार फलकाजवळील रोहीत्र पाण्यात बुडाले. त्यामुळे शहराचा विजपुरवठा बंद करण्यात आला.

विज वितरणचे शहर अभियंता आर.एन.पाटील व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी पुराचे पाणी ओसरल्यानंतर अवघ्या तासाभरात काही भागातील विजपुरवठा सुरळीत करण्यात आला. त्यामुळे शहरवासीयांनी त्यांना धन्यवाद दिले.विशेष करून दुर्गोत्सव मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आर.एन.पाटील व विज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांचे जाहीर आभार मानले.


Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*