Breaking

एरंडोल येथे विजेचा धक्का लागून एकाचा मृत्यू ; गजमल नगर येथील घटना


एरंडोल: येथे इब्राहिम उमर पिंजारी वय ७८ वर्ष हा इसम गजमल नगरा मधील शिरसाठ नावाच्या शिक्षका कडे जवळपास दोन महिन्यांपासून हात मजुरी ने काम करीत होता.३० सप्टेंबर २०२५ रोजी तो शिरसाठ यांच्या घरासमोरील झाडाच्या फांद्या तोडत असताना. लोखंडी विळा लागल्याने त्याला विजेचा शॉक लागून त्याचा मृत्यू झाला.

ही घटना सकाळी 11 वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी एरंडोल पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार विजय पाटील हे पुढील तपास करीत आहेत.


Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*