Breaking

एरंडोल येथे नवरात्री दुर्गा नवमी व जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त ज्येष्ठ महिलांचा शाल व श्रीफळ देऊन केला सन्मान


एरंडोल – येथे श्रीराम चौकात नवरात्री नवमी व जागतिक जेष्ठ नागरिक दिनानिमित्त ज्येष्ठ महिलांना शाल, श्रीफळ, पुष्पहार व भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. त्यात जिजाबाई चौधरी,लिलाबाई पाटील, इंदुबाई पाटील, कमलाबाई जाधव, रंभाबाई पाटील या ज्येष्ठ महिलांचा समावेश होता.

यावेळी सेवानिवृत्त आरोग्य सेविका शोभा पाटील व राजश्री महाजन या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. यावेळी देवीचे भजन, गरबा व दांडिया तसेच सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. याप्रसंगी ज्येष्ठ महिलांची समोयोचित भाषणे झाली.


Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*