एरंडोल:- येथील विवेकानंद केंद्र कन्याकुमारी शाखेतर्फे स्वामी विवेकानंद यांच्या १६१ वी जयंती, भारतीयांचे आराध्य दैवत श्री प्रभु रामचंद्र यांच्या अयोध्येतील भव्य मंदिरातील रामलल्ला मूर्तीची प्राणप्रतिष्ठा व छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्ष पूर्ण होत आहेत.
त्यानिमित्ताने रक्तदान शिबिराचे २१ जानेवारी रोजी रा.ति.काबरे विद्यालयाच्या प्रांगणात सकाळी ०९:३० ते संध्याकाळी ०५:०० वाजे पर्यंत आयोजन करुन पंधरा वर्षाची परंपरा कायम ठेवले आहे .शिबिर माधवराव गोळवलकर स्वयंसेवी रक्तकेंद्र जळगाव यांच्या सौजन्याने होत आहे.
याप्रसंगी प्रथम १६१ रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांना २०२४ची डायरी भेट देण्यात येणार आहे. रक्तदान हे जीवनदान असून जास्तीत जास्त रक्तदात्यांनी रक्तदान करावे असे आयोजकांनी आवाहन केला आहे
Leave a Reply